Home > रिपोर्ट > मोठी बातमी : पंकजा मुंडे यांचा भाजपच्या कोअर कमीटीचा राजीनामा

मोठी बातमी : पंकजा मुंडे यांचा भाजपच्या कोअर कमीटीचा राजीनामा

मोठी बातमी : पंकजा मुंडे यांचा भाजपच्या कोअर कमीटीचा राजीनामा
X

“पंकजा मुंडे पक्ष सोडणार अशी बातमी कोणी लावली? याचा शोध घ्यावा तसंच कोअर कमिटीमधून मला मुक्त करावं,” असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आज कोअर कमीटीचा राजीनामा दिला आहे.

पंकजा मुंडे पदासाठी दबाव आणतात. या चर्चेला पुर्णविरोम देण्यासाठी मी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमीटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचं पंकजा यांनी सांगितलं.

आज गोपिनाथ गडावर माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते दिवंगत गोपिनाथ मुंडे यांची जयंती सोहळा पार पडला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर, पाशा पटेल यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे उपस्थित होते.

यातील बहुतेक नेत्यांच्या भाषणाचा जर रोख पाहिला तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच होता. दरम्यान या सर्व घडामोडी पाहता भाजपचा अंतर्गत वाद समोर आला आहे.

Updated : 12 Dec 2019 10:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top