Home > केंद्र सरकारलाही लाजवणारी सोनिया गांधींची मजूरांसाठी ‘ही’ मोठी घोषणा

केंद्र सरकारलाही लाजवणारी सोनिया गांधींची मजूरांसाठी ‘ही’ मोठी घोषणा

केंद्र सरकारलाही लाजवणारी सोनिया गांधींची मजूरांसाठी ‘ही’ मोठी घोषणा
X

लॉकडाऊन 3.0 घोषित करण्यापुर्वी केंद्र देशभरात अडकलेल्या स्थलांतरीक कामगारांना घरी जाण्याचा मार्ग मोकळा केला आहे. रेल्वे प्रशासनाकडून त्यासाठी काही विशेष रेल्वेसुरु करण्यात आल्य़ा आहेत. परंतू आपल्या गावी जाण्यासाठी कामगारांना प्रवासाची किंमत मोजावी लागते आहे. म्हणूनच, मजूरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी लागणाऱ्या टिकीट खर्चाची सोय कॉंग्रेस पार्टीकडून केली जाईल अशी घोषणा कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांनी केलीय.

हे ही वाचा...

सरकार विदेशात अडकलेल्या धनाड्य नागरिकांसाठी विमानसेवा मोफत पुरवते मग गरिब आणि गरजू स्थलांतरीत लोकांसाठी रेल्वेसेवा मोफत का देऊ शकत नाही असा घणाघाती सवाल सोनिया गांधी यांनी विशेष पत्रकातून केला आहे.

राष्ट्रीय कॉंग्रेस या स्थलांतरीत गरजू कामगारांच्या प्रवासाच्या खर्चाची (Migrants Train Fare) जबाबदारी घेत असल्याचं सोनिया गांधी यांनी या पत्रकातून स्पष्ट केलंय. “श्रमिक आणि कामगार य़ा देशाच्या पाठीचा कणा आहेत. १९४७ च्या भारत पाक फाळणीनंतर प्रथमच असा हृदय़द्रावक प्रसंग देशावर ओढावला आहे. मजूर आपल्या घराकडे जाण्याच्या आशेने शेकडो किलोमीटर लांबचा प्रवास करत आहेत.” असं दु:ख सोनिया गांधी व्यक्त केलं.

“सरकार विदेशात अडकलेल्या भारतीयांना विमानाने निशुल्क आणु शकते. गुजरातमधील कार्यक्रमासाठी सरकारी खजिन्यातून दळणवळण आणि जेवणासाठी १०० करोड खर्च करु शकते. रेल्वे मंत्रालय पीएम केअर फंडासाठी 151 करोड रुपये देऊ शकते. पण प्रगतीच्या धव्जवाहकांसाठी मोफत रेल्वे प्रवासाची सुविधा देऊ शकत नाही का?” असा सवाल सोनिया गांधी यांनी उपस्थित केलाय.

Congress- soniya gandhi-migrants Train fare Courtesy : Social Media

Updated : 4 May 2020 4:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top