Home > व्हिडीओ > सोनिया गांधींवर ओरडून टीका करणारे पेरतायत जातीय द्वेषाचं विष

सोनिया गांधींवर ओरडून टीका करणारे पेरतायत जातीय द्वेषाचं विष

सोनिया गांधींवर ओरडून टीका करणारे पेरतायत जातीय द्वेषाचं विष
X

देशात कोरोनाचं संकट असताना रिपब्लिक भारत वृत्तसंस्थेचे पत्रकार अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांनी कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यावरुन देशाचं वातावरण चांगलच तापलं आहे. कोरोनावर एकजुटीने मात करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर आरोप करणारे जातीय आणि धार्मिक विष पेरत असल्याची टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

“सोनिया गांधी यांच्याविषयी राजकीय आणि व्यक्तीगत मतभेद असू शकतात. मात्र ज्या पद्धतीने त्यांच्यावर जोरजोराने ओरडून टिपण्णी केली जातेय त्याच्यामागे षडयंत्र आहे. यात सुसुत्रता आहे. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न आहे.” अशी टीका करत अर्णब गोस्वामी यांच्य़ावर राऊत यांनी निशाणा साधला. घटनेनं तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे पण तुम्ही जे विष पेरताय ते देशाला कोरोना इतकंच घातक आहे.

अर्णब यांनी त्यांच्यावर हल्ला झाल्याचं सांगितल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांना पुर्ण पाठींबा देताना सोनिया गांधीविरोधात अधिक आक्रमक पवित्रा घेतला होता.

“सोनिया गांधींचं राजकारण सोनिया गांधींकडे पण तुम्ही देशाची वाट लावताय. मतभेद अशा प्रकारे व्यक्त करणं आणि लोकांना भ्रमिष्ट करुन रस्त्यावर उतरायला प्रवृत्त कऱण्याचं काम तुम्ही करताय यावरुन तुम्ही खरंच या देशाचे नागरिक आहात की कोणत्या परकीय शक्ती तुम्हाला या देशाविरुद्ध वापरुन घेत आहे अशी शंका संजय राऊत यांनी उपस्थित केलीय.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/256323692396884/?t=103

Updated : 24 April 2020 5:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top