मोठी कारवाई ; एकाच कंपनीत सव्वाशे बालमजूर काम करत होते, धाड टाकत केला पर्दाफाश..

Update: 2022-05-12 17:50 GMT

कोल्हापूर जिल्यातील शिरोली येथील एमआयडीसी मधील पॉलीसॅक्स कंपनीमध्ये सव्वाशे बालमजूर काम करताना पकडले आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बनविलेल्या संयुक्त पथकाने धाड टाकून ही कारवाई केली आहे. हे सर्व कामगार एकाच कंपनीमध्ये काम करत होते.

कोल्हापूरात झालेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. अजूनही काही ठिकाणी असे बालमजूर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे बालमजूर पश्चिम बंगाल, मिझोराम तसेच विविध राज्यांमधले असल्याचे आता समोर येत आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना यासंदर्भातील माहिती मिळताच त्यांनी सहाय्यक आयुक्त, अवनी संस्था, जिल्हा महिला बालविकास विभाग आणि पोलिसांचे संयुक्त एक पथक बनवले. या पथकाने आज दुपारच्या वेळेस या संबंधित कंपनीवर धाड टाकली व सव्वाशे बालमजूर काम करताना आढळले. कोल्हापूर जिल्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

Tags:    

Similar News