आजच्या विधानपरिषदेत भाजप आमदार भारती लव्हेकर यांनी कोळीबांधवांचा मुद्दा उपस्थित करून त्यांना ७० कोटी मदतीची मागणी केली आहे. मच्छिमारांसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगले काम केले आहे. त्याचबरोबर मच्छिमारांसाठी अर्थसाहय्य करणं गरजेचं आहे. या जीआरमध्ये ६ बाबींविषयी अधिक गोष्टींची गरज आहे. आता सुरु असलेल्या जेबीएलारच्या रस्त्याचं काम त्वरित होण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. ४ ब्रीजचे काम सुरु असल्यामुळे वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. या ब्रीजचे काम लवकरात लवकर व्हावी. या सर्व प्रश्नाबरोबर कचरा,वाहतूक,कोळीवाड्याचे प्रश्न त्वरित सोडवावा अशी मागणी आमदार भारती लव्हेकर यांनी केली.
https://youtu.be/rk7dc9kpYx0