महिला बालकल्याण मंत्री आणि अमरावती जिल्हयाचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शहरातील वाढत्या अवैध उद्योगधंदे बाबत आढावा बैठक घेतली असता ग्रामीण भागात अवैध दारू विक्री,गुटखा,रेती तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.याबाबत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जोपर्यंत पोलिसांचा धाक दिसेल तरच समाजात शिस्त येईल तसेच महिला अत्याचार हे थांबले पाहिजे पोलिसांचा शहर तथा ग्रामीण भागात धाक दिसला पाहिजे, अमरावती शहरात येण्यासाठी आणि जाण्यासाठी जो काही त्रास होत आहे तो कमी झाला पहिजे आणि त्या ठिकाणी शिस्त दिसली पाहिजे आणि त्याचे निर्देश अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी या बैठकीत पोलीस अधीक्षक सह पोलीस अधिकारी उपस्थित होते.
https://youtu.be/DAPBABViOXY