तिचे शेवटचे शब्द ऐकुन तुम्ही सुन्न व्हाल

Update: 2019-12-07 05:10 GMT

हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार केल्यानंतर तिची जाळून हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांची असताना उन्नाव येथील सामूहिक बलात्कारपीडितेचा रात्री उशिरा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी पाच जणांनी तिच्यावर हल्ला करून तिला पेटवून दिले होते. यानंतर परिस्थिती अधिक गंभीर असल्यामुळे ९० टक्क्य़ांहून अधिक भाजल्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र ९० टक्क्य़ांहून अधिक भाजल्यामुळे ११.४० च्या सुमारास सफदरजंग रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. बलात्कार पीडितेला जाळणाऱ्या आरोपींच्या नातेवाईकांकडून आपल्याला धमक्या दिल्या असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. काळ शुक्रवारी पीडितेने शेवटचा सवांद आपल्या भावाजवळ केला असता

“आरोपियो को छोड़ना नहीं” क्या मै बच जाहुंगी , मै मरणा नही चाहती,

मन हेलवणारा सवांद तिने आपल्या भावाजवळ केला. या पीडितेवर गेल्यावर्षी बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींपैकी एकाला दहा दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी अजूनही फरार आहे. गुरुवारी सकाळी पाच जणांनी तिच्यावर हल्ला करून तिला पेटवून दिले होते.

https://youtu.be/IKJKaUDggMs

 

 

 

 

 

Similar News