तीन तलाक दिल्यामुळे तिने स्वीकारलं हिंदू धर्म

Update: 2019-05-17 10:32 GMT

तीन तलाक मिळालेल्या एका पीडित महिलेने धर्म बदलून पुनर्विवाह केल्याची घटना न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशमधील पीलीभीत इथल्या देशनगर नावाच्या मोहल्ल्यात घडली आहे. रेश्मा असं या महिलेचं नाव आहे. मात्र विवाहानंतर तिच्या हिंदू पतीला जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.तीन वर्षांपूर्वी तिचं विवाह कांशीराम कॉलनी येथील मोहम्मद रईस याच्याशी झाला होता.मात्र लग्नानंतर वाद होत असल्यामुळे मोहम्मदने रेश्माला मारहाण करायला सुरुवात केली . सततच्या या त्रासाला कंटाळून मोहम्मदने तिला 5 एप्रिल 2019 रोजी तीन तलाक दिला.

दरम्यान तिची ओळख कॉलनीतच राहणाऱ्या दीपक राठोडशी झाली होती. त्यातूनच या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. रेश्माने बुधवारी हिंदू धर्माचा स्वीकार करत आपलं नाव बदलून राणी असं ठेवलं आणि दीपकशी विवाह केलं . मात्र जात वेगळी असल्यामुळे लग्न झाल्यानंतर दीपकला धमक्या येत आहेत. दरम्यान या जोडप्याने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

Similar News