शेतकऱ्यांना आश्वस्त शब्दात हमी द्यावी - पंकजा मुंडे

Update: 2019-11-04 10:26 GMT

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या परळी मतदारसंघातील विधानसभा निवडणूकीत पंकजा मुंडे (Pankaja munde) यांना पराभव स्वीकारावा लागला. या पराभवातुन सावरत त्यांनी आता पुन्हा कामाला लागल्या आहेत.

"देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी हा जगायलाच हवा आणि त्याच्यासाठी सरसकट अतिवृष्टीची नुकसान भरपाई द्यावी. लोकांच्या रांगा आणि अस्वस्थता शांत करण्यासाठी आश्वस्त करणारे शब्द आवश्यक आहेत. अधिकारी आणि बँक यांना कडक सूचना आवश्यक आहेत. असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे."

राज्यातील ३२५ तालुक्यांमधील ५४ लाख २२ हजार हेक्टरवरील पीकं बाधित झाली असून, त्यामध्ये ज्वारी, मका, धान, तूर, कापूस, सोयाबीन आणि फळपिकं यांचा समावेश आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी रकमेची तरतुद केली असली तरी, आता परतीच्या पावसात उद्धवस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Similar News