दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना एक तासाहून कमी काळासाठी गाडी पार्क करायची असेल तर अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या पार्कींगच्या आवारात कमी वेळासाठी देखील जास्त कर आकारला जातो. यासंदर्भात शिवसेनेच्या भावना गवळी यांनी बंड केला आहे.
वाशीम रेल्वेस्टेशन वर आजपासून दहा वीस मिनीटांसाठी कोणत्याही प्रकारची फी देऊ नये तसेच एका तासाच्या वर पार्कींग केली असले तरच पावती फाडावी अस ठणकावून पार्किंग चालकास ठणकावून सांगितलं आहे.
शिवाय तेथे जमलेल्या शिवसैनिकांनी पार्कींग चालकास चांगलाच चोप दिला आहे.यामुळे कमी वेळासाठी वाहन पार्क करणाऱ्यांचे पैसे वाचणार आहेत.