मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर मिसेस मुख्यमंत्र्यांचे ट्विट

Update: 2019-11-09 08:11 GMT

निवडणूकीचा निकाल लागून जवळ जवळ १५ दिवस उलटून गेले आहेत. तरी देखील राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकारणी घडामोडींमुळे अजूनही सत्ता स्थापन झाली नाही. यामुळे विधानसभेचा कार्यकाळ संपण्याच्या काही काळ आधी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन कौतुक केले आहे.

मला तुमच्या निर्णयाचा आणि भूमीकेचा अभिमान आहे. असं ट्विट करून अमृता फडणवीस यांनी कौतुकास्पद ट्विट केलं आहे. शिवाय देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केले आहे. अमृता फडणवीस या नेहमी सोशल मिडीयाच्या माध्यमातून चर्चेत असतात शिवाय प्रसार माध्यमातून त्या राजकीय घडामोडींवर आपली मतं मांडत असतात.

हेही वाचा

Similar News