हैदराबाद बलात्कार प्रकरणा विरुद्ध भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आक्रमक होऊन त्यांनी महिला कार्यकर्त्यांसह तेलंगानाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या राहत्या घरासमोर विरोध निदर्शने केली. यानंतर तेलंगाना पोलिसांनी त्यांना अटक केली. हैदराबादमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि खून केल्याप्रकरणाचे पडसाद देशभर उमटले. तेलंगानाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या घरासमोर निदर्शने केल्यामुळे तेलंगाना पोलिसांनी तृप्ती देसाई यांना अटक केली आहे. मुख्यमंत्र्यांना पीडितेच्या घरी जायला वेळ नाही, मात्र त्यांना लग्नासाठी जाण्यासाठी वेळ आहे अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावर केली.
https://youtu.be/7PyFk0dl44c