रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून अनेकांचे संसार उधवस्त झाले. अनेकांना आपले कुटुंब गमवावे लागले आहेत. या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारुन जलसंवर्धन मंत्री गिरीष महाजन आणि तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र युवक कॉग्रेसच्या सचिव कल्याणी रांगोळे यांनी केलीय. यासंदर्भात नाशिक जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय.
राज्यातील धरणांची तात्काळ दुरुस्ती आणि तपासणी करा, असा अहवाल नाशिकच्या डीएसओनी केला होता. या अहवालाकडे मंत्री गिरीश महाजन आणि तानाजी सावंत यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच तिवरे धरण दुर्घटनेला गिरीश महाजन आणि तानाजी सावंत जबाबदार आहेत असं कॉग्रेसच्या सचिव कल्याणी रांगोळे यांनी म्हटलंय.