हिंगणघाट जळीत कांडाच्या घटनेनंतर संपुर्ण राज्य हादरुन गेलं. लगोलग नाशिकच्या लासलगावातही या घटनेची पुनरावृत्ती झाली. याविषयी भाजप नेत्या चित्रा वाघ (chitra Wagh) यांनी तिव्र संताप व्यक्त केला आहे. “त्या पीडिता जळाल्या नाहीत तर, समाजव्यवस्थेचा बुरखा जळाला आहे.” अशी टीका त्यांनी आपल्या समाजव्यवस्थेवर केली.
“राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराचं प्रमाण वाढत आहेत. आपण म्हणतो आम्ही जिजाऊंच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी पण, आज आमच्या शौर्याच्या कथांपेक्षा आमच्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या कथा जास्त आहेत. हे अत्यंत वेदनादायी आहे” अशी खंत चित्रा वाघ यांनी व्यक्त केली. पाहा व्हिडीओ...
https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/1323728777835690/?t=664