Kbc ला अकराव्या पर्वाचा दुसरा करोडपती मिळाला आहे. अमरावतीत राहणारी बबीता ताडे असं या विजेती महिलेचं नाव आहे. बबीता ताडे या अंजनगाव सूर्जीच्या शाळेत शालेय पोषण आहाराची खिचडी बनवण्याचं काम करतात. सोनी टीव्ही ने ट्विटर वरून या विजेती महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे.
अमरावतीत राहणाऱ्या या महिलेने आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर मुंबई गाठून कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या आणि कार्यक्रमा दरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं देत त्या करोडपती झाल्या.
यापूर्वी बिहारमधील सनोज राज हा ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचा अकराव्या पर्वातील पहिला करोडपती विजेता मिळाला होता. त्यानंतर आता बबीता ताडे यांनी देखील kbc च्या अकराव्या पर्वाच्या करोडपतींच्या यादीत आल्या आहेत.