विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून सोलापूर शहरामध्ये मतदार संघाच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. निवडणुकीची तारीख जाहीर होताच दुसऱ्याच क्षणाला त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला. तर आता सोलापूर मधील मुस्लीम समाजानेही शिंदे यांना मोहोळ राखीव मतदार संघातून उमेदवारी देण्यात यावी अशी आग्रही मागणी पक्षप्रमुखांकडे केली आहे.
सोलापूर शहर मध्य मतदार संघामध्ये एक लाखांपेक्षा अधिक मुस्लिम मतदार आहेत. मुस्लीम समाज हा सातत्याने काँग्रेसच्या पाठिशी उभा आहे. सोलापूर लोकसभा किंवा विधानसभेत मुस्लीम समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे या समाजातील उच्चशिक्षीत कार्यकत्यांमध्ये या विषयाला घेऊन नाराजी आहे. प्रणिती शिंदे यांना सोलापूर शहर मध्य मतदार संघातून उमेदवारी न देता, मोहोळ राखीव मतदार संघाची उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे मुस्लिम समाजाने केली असल्याची माहिती ज्येष्ठ नेते यू. के. बेरिया यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे.