आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात येणाऱ्या, उद्योगात आपलं अस्तित्व शोधणाऱ्या आणि उद्योगांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यास धडपड करणाऱ्या उद्योगिनींची २३ वी वार्षिक राज्यव्यापी उद्योजक महिला परिषद पार पडली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, अभिनेत्री अनिता दाते, दि.सारस्वत को-ऑप बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो महिला उद्योगिनी या कार्यक्रमास उपस्थित होत्या.