सांगली - कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीनंतर या भागात मदतीचा ओघ वाढलेलं आहे. सर्वच स्तरांमधून येथील नागरिकांसाठी मदतीचे हात पुढे येत आहेत. यामध्ये आता अभिनेत्री आणि शिवसंग्राम पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा दिपाली सय्यद यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
अभिनेत्री दिपाली सय्यदनेदेखील सांगलीतील १ हजार मुलींच्या लग्नाची जबाबदारी उचलली आहे. त्याचबरोबर पूरग्रस्तांसाठी सय्यद फाऊंडेशनच्या माध्यमातून ५ कोटी रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे.