Home > व्हिडीओ > कोरोनाच्या संकटात सीनियर आणि ज्युनियर पोलिस कर्मचाऱ्यांची जमली गट्टी

कोरोनाच्या संकटात सीनियर आणि ज्युनियर पोलिस कर्मचाऱ्यांची जमली गट्टी

कोरोनाच्या संकटात सीनियर आणि ज्युनियर पोलिस कर्मचाऱ्यांची जमली गट्टी
X

‘कोरोनाच्या संकटाने आम्हा पोलिसांचं मनोधैर्य इतकं उंचावलं आहे की, आता सीनियर आणि ज्युनियर पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये पहिल्यापेक्षा जास्त बॉन्डींग वाढली आहे.’ अशी भावना व्यक्त केलीय जे जे पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांनी म्हणजेच मुंबईच्या कोरोना योद्ध्यांनी...

हे ही वाचा...

प्रसंग होता जेजे पोलिस ठाण्यातील तीन योद्धा कोरोनावर मात करुन पुन्हा ड्युटीवर रुजू होतानाचा.. जे जे पोलिस स्थानक सर्वाधिक कोरोनाबाधित पोलिसांचे स्थानक आहे. येथुन ४०हुन अधिक जास्त पोलिस बाधित आहेत. एका दिवसात पोलिस शिपाई सरनाईक, पोलिस शिपाई भुसे आणि पोलिस शिपाई झेंडे या तिघांनीही सोबतच कोरोना विरोधात लढाई लढली. कोरोनावर मात करुन पुन्हा आपली खाकी घालून पुन्हा नव्याने लढाईसाठी सज्ज झालेत.

तिघांच्याही स्वागतासाठी सीनियर पोलिस अधिकाऱ्यांसह संपुर्ण चौकीतील पोलिस कर्मचारी बाहेर आले आणि जोरदार टाळ्या वाजवुन त्य़ांचं कामावर स्वागत केलं. या पोलिस शिपायांनी आपल्या सीनियरला सॅल्युट करत पोलिस ठाण्याच्या पायरीला स्पर्श करुन कामाला सुरुवात केली. स्वागतानंतर पोलिस शिपायांनाही आपले आनंदाश्रू लपवणं शक्य झालं नाही. पाहा व्हिडीओ...

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/953504805103897/?t=1

  • हे ही पाहा...

Updated : 23 May 2020 4:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top