Home > Max Woman Blog > आम्ही ट्रोल का होतोय?

आम्ही ट्रोल का होतोय?

आम्ही ट्रोल का होतोय?
X

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सध्या वारं उलट्या दिशेनं वाहतंय. गेल्या काही वर्षात सोशल मीडियाच्या मैदानात एकहाती वर्चस्व राखणाऱ्या भाजपला आता त्यांच्याच खेळात शह दिला जातोय. भाजप सत्तेत असताना विरोधकांकडून नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना केल्या जाणाऱ्या ट्रोलींगविरोधात आवाज उठवला जायचा. पण आता तेच तंत्र त्यांनीही अवगत केलं आहे हे स्पष्ट आहे. राजकीय पक्षांमधील हे सोशल वॉर आता अधिकचं तीव्र होत चाललंय.

हे ही वाचा...

नुकत्य़ाच झालेल्या ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलनापुर्वी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मेकअप करत असल्याचा एक जुना फोटो व्हायरल झाला आहे. यावर मुंबई भाजपानं शिवसेनेला नोटीस पाठवली आहे, तसंच नागपुरमध्ये देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.

व्हायरल झालेला फोटो बदनामी करणारा असल्याचं मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलं. शिवसेनेच्या मुंबईतल्या टीमनं हा व्हिडीओ व्हायरल केल्याचा दावा त्यांनी केला. 'आंदोलन करताना सुद्धा मेकअप मॅन सोबत, आता बोला आंदोलन होतं की फोटो शूट? ही लोक महाराष्ट्र वाचवणार,' अशा आशयासह फडणवीसांचा हा जुना फोटो व्हायरल झाला.

Fadanvis Viral Photo Courtesy : Social Media

भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, अशिष शेलार आणि त्यांच्याही सोशल मीडियावरील पोस्टवर मोठ्या प्रमाणात ट्रोलींग करण्यात आल्याचं म्हटलं आहे. हे नेटीझन्स नसून महाविकासआघाडी ची ‘ट्रोलींग आर्मी’ आहे अशी टीका त्यांनी केली होती.

तर, काही दिवसांपुर्वीच विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी महाराष्ट्र पोलिस सायबर सेलकडे देवेंद्र फडणवीस यांना ट्रोलर्सकडून ‘टरबुज्या’ आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ‘चंपा’ अशा नावांनी संबोधित केलं जात असल्याची तक्रार दाखल केली होती.

एकुणच सोशल मीडिया ट्रोलींगवरुन पहिल्यांदाच भाजप नेते अशाप्रकारे व्यक्त होत आहेत. कधी नव्हे ते या भाजप नेत्यांना आता तक्रारी दाखल कराव्या लागत आहेत. अर्थातच यात सत्ताधाऱ्यांकडून सतत ‘ट्रोलींग संस्कृतीचा पायंडा कोणी रचला?’ असं म्हणंत प्रश्नांना बगल दिली जातेय.

भाजपने २०१४ आणि २०१९ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा केलेला प्रभावी वापर आणि त्यातुन मिळालेलं त्यांचं यश आपण पाहिलंच आहे. पण सद्यस्थिती पाहता भाजपावर या माध्यामात कुरघोडी होताना दिसते आहे. यात ट्रोल्सनी भाजपचे काही चेहरे हेरले आहेत. हे चेहरे म्हणजे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, अशिष शेलार, विनोद तावडे, चित्रा वाघ आणि अजून काही नेतेमंडळी.

हेरलेल्या प्रत्येक चेहऱ्यांच्या हालचालीवर नजर ठेवली जाते. स्वतंत्र यंत्रणा प्रत्येक व्यक्तीमागे चालवली जाते. अगदी जुन्या नव्या अशा सर्वच व्हिडीओ, फोटो, भाषणांचा साठा केला जातो. सोयीनुसार आणि राजकीय स्थितीनुसार त्यांचा प्रभावी वापर केला जातो. खासगी आयुष्यावर टीका करणं हे ट्रोलर्सचं सर्वात प्रभावी आणि सोयीस्कर हत्यार आहे. अशा पद्धतीने ही यंत्रणा काम करते.

भाजपमधील नेत्यांपेक्षा अधिक महत्त्वाचा आणि ट्रोल्सचा आवडीचा चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांचा आहे. आपल्या राजकीय विधानांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या अमृता फडणवीस ट्रोल्सच्या कायम निशाण्यावर असतात. सत्तांतराच्या काळात ठाकरेंविरोधातील सततच्या राजकीय ट्वीटमुळे तर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं.

पण, एवढ्यावरच न थांबता त्यांच्या खासगी आय़ुष्यावरही खुप टीका कऱण्यात आल्या आहेत. कोणताही अराजकीय़ कार्यक्रम असो किंवा गाण्याचं लॉंचिंग असो तिथे ही मंडळी पोहोचलेली असतात. अगदी ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर अमृता फडणवीस यांनी कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कोरोना योद्धांसाठी गायलेलं गाणं आहे. तुही मंदिर तुही शिवाला या गाण्याखालील काही कमेंट आपण पाहुयात...

[gallery columns="1" size="full" bgs_gallery_type="slider" ids="13742,13743,13744"]

या सर्व कमेंटमध्ये तुम्हाला एकही चांगली किंवा गाण्याची स्तुती करणारी कमेंट मिळणार नाही. अर्थात यापैकी बहुतेक अकाऊंट फेक आहेत ज्यांचा काहीच मागोवा लागणार नाही. सुरुवातीला लिहलेल्या कमेंट या इतरांसाठी दिशादर्शक ठरतात. त्यानुसार सर्वसामान्य आणि खरा व्यक्ती आपली कमेंट लिहतो.

भाजपला येत्या काळात अशा अनेक ट्रोल्सचा सामना करायचाय. सोबतच प्रतिकारासाठी आपल्या बहुचर्चित आयटी सेलचीही पुर्नबांधणी करण्याचा प्रयत्न ते नक्कीच करतील. एकुणच ट्रोलींग संस्कृती फारच घातक वळण घेण्याच्या दिशेने कुच करताना दिसत आहे. समाजमाध्यमांमध्ये एखाद्या व्यक्तीचं चारित्र्यहनन करुन राजकीय सूड उगारण्याची रित रचली जातेय.

Updated : 24 May 2020 9:35 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top