Home > News > आर आर आबांचा नातू 

आर आर आबांचा नातू 

आर आर आबांचा नातू 
X

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या निधनानंतर त्यांची कन्या स्मिता पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला. मात्र कालांतराने स्मिता पाटील यांचाही राजकारणातील वावर कमी झालेला दिसला. आर आर पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील आणि मुलगा मात्र अधे-मध्ये चर्चेत असलेलं पाहायला मिळत होतं.

हे ही वाचा

या महिला नेत्या 10 बजावणार भाजपच्या कार्यकारणीत महत्वाची भुमीका…

राज्यात पहिल्यांदाच महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण

या महिला नेत्या 10 बजावणार भाजपच्या कार्यकारणीत महत्वाची भुमीका…

प्रत्यक्ष राजकीय पटलावर अदृश्य असलेल्या स्मिता पाटील यांनी सोशल मिडीयावर मात्र आपलं अस्तित्व कायम ठेवलं आहे. स्मिता पाटील यांनी आपल्या मुलाचा वारकऱ्याच्या वेशातला फोटो फेसबुक वर शेअर करून आबांचा नातू असं कॅप्शन दिलं आहे. आबांचं आणि वारीचं एक अतुट नातं होतं. पंढरपुरात गेल्यानंतर आबा आवर्जून विठ्ठल मंदिरात जात आणि तिथल्या खांबांची भेट घेत. दोन्ही कान पकडून उड्या मारत अनेकदा आबांनी भजन ही केलेलं आहे. त्यामुळे आबांच्या आठवणी जागवणाऱ्या आबांच्या नातवाचा फोटो ही सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहेे.

Updated : 4 July 2020 7:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top