Home > News > “माझ्या विषयीची भूमिका जाहीर केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचे आभार” – पंकजा मुंडे

“माझ्या विषयीची भूमिका जाहीर केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचे आभार” – पंकजा मुंडे

“माझ्या विषयीची भूमिका जाहीर केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचे आभार” – पंकजा मुंडे
X

भाजपची महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर झाली. यात पंकजा मुंडे यांना कोणतही स्थान मिळालेलं नाही. त्यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. यावर पंकजा मुंडे यांनी ट्वीट करुन आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे.

“भाजपच्या नवीन टीमचे अभिनंदन. माझ्या विषयीची भूमिका जाहीर केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार,” असं ट्विट पंकजा मुंडें यांनी केलं आहे. तर बहिण प्रितम मुंडे यांना या कार्यकारिणीत प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या संदर्भात पंकजा यांनी प्रितम मुंडे यांचं ट्विट करुन अभिनंदन केलं आहे.

"प्रितम मुंडे ताईला शुभाशीर्वाद प्रदेशाचे उपाध्यक्ष मिळाल्या बद्दल अभिनंदन... मुंडे- महाजनाच्या संघटनेतील कामाचा वारसा चोख बाजावशील असा पूर्ण विश्वास. गुड लक." असं ट्विट पंकजा मुंडें यांनी केलं आहे.

Updated : 4 July 2020 1:41 AM GMT
Next Story
Share it
Top