Home > या 10 महिला नेत्या बजावणार भाजपच्या कार्यकारिणीत महत्वाची भुमीका...

या 10 महिला नेत्या बजावणार भाजपच्या कार्यकारिणीत महत्वाची भुमीका...

या 10  महिला नेत्या बजावणार भाजपच्या कार्यकारिणीत महत्वाची भुमीका...
X

भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली. या प्रमुख कार्यकारणीत 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहेत. असे चंद्रकांत पाटलांनी घोषित केले. यात एकूण दहा महिला नेत्यांना संधी देण्यात आली आहे.

या कार्यकारणीत महिला मोर्चाची जबाबदारी उमा खापरे यांच्यावर देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ यांना प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आलं आहे. तर नाशिकमधून डॉ. भारती पवार यांना स्थान देण्यात आलं आहे.

या महिलांचा कार्यकारिणीत समावेश...

उपाध्यक्ष –प्रितम मुंडे, चित्रा वाघ, माधवी नाईक, भारती पवार

महामंत्री – देवयानी फरांदे

सेक्रेटरी – रक्षा खडसे, अर्चना डेहनकर, स्नेहल कोल्हे

महिला मोर्चा – उमा खापरे

प्रतोद - माधुरी मिसाळ

Updated : 4 July 2020 5:46 AM GMT
Next Story
Share it
Top