Home > News > राज्यात एकाच दिवसात बरे झाले ५ हजारहून अधिक रुग्ण

राज्यात एकाच दिवसात बरे झाले ५ हजारहून अधिक रुग्ण

राज्यात एकाच दिवसात बरे झाले ५ हजारहून अधिक रुग्ण
X

राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज राज्यभरात ५ हजार ७१ (More than 5000 patients) रुग्णांना दवाखान्यातून सोडण्यात आले असून मुंबई मंडळात सर्वाधिक ४२४२ एवढे रुग्ण एकाच दिवशी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दि. २९ मे रोजी राज्यात एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून सुमारे १५ दिवसानंतर आज पुन्हा एकदा बरे होणाऱ्या रुग्णांची विक्रमी संख्या गाठली आहे.

हे ही वाचा

….म्हणून एकता कपूर ने ट्रिपल एक्स 2 मधील सैन्याशी संबंधित वादग्रस्त सीन हटवले

कोरोनाला आळा घालणारा अमरावती पॅटर्न

22 दिग्गज साहित्यिकांच्या आयुष्यातलं प्रेम एकाच पुस्तकात…

आज सोडण्यात आलेल्या ५०७१ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ४२४२ (आतापर्यंत एकूण ३९ हजार ९७६) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ५६८ (आतापर्यंत एकूण ८४३०), नाशिक मंडळात १०० (आतापर्यंत एकूण २३६५), औरंगाबाद मंडळ ७५ (आतापर्यंत एकूण १९४५), कोल्हापूर मंडळ २४ (आतापर्यंत एकूण १०३०), लातूर मंडळ ११ (आतापर्यंत एकूण ४४४), अकोला मंडळ २२ (आतापर्यंत एकूण १०४८), नागपूर मंडळ २९ (आतापर्यंत एकूण ८११) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

Updated : 15 Jun 2020 4:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top