Home > News > 'आशेचा' किरण! अमित ठाकरेंच्या पाठपुरव्याला यश, आशा सेविकेच्या मानधनात होणार २ हजार रुपयांची वाढ

'आशेचा' किरण! अमित ठाकरेंच्या पाठपुरव्याला यश, आशा सेविकेच्या मानधनात होणार २ हजार रुपयांची वाढ

आशेचा किरण! अमित ठाकरेंच्या पाठपुरव्याला यश, आशा सेविकेच्या मानधनात होणार २ हजार रुपयांची वाढ
X

सार्वजनिक आरोग्य खात्याच्या 'राष्ट्रीय आरोग्य अभियाना'अंतर्गत महाराष्ट्र राज्यात एकूण ७२,००० (asha sevika) आशा स्वयंसेविका (Accredited Social Health Activist) व सुमारे ३५०० गटप्रवर्तक कार्यरत आहेत.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या या 'आशां'नी करोना संकटकाळात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावूनही त्यांना अत्यंत तुटपुंजे (रु. १६००- रु. २५००) मानधन दिले जाते.

त्यामुळे आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 'आशा' गेली पाच वर्षं राज्य सरकारशी पाठपुरावा करत आहेत. पण त्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही. म्हणून या आशा सेविकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांची भेट घेऊन 'आशा'च्या शिष्टमंडळाने आपल्या समस्या मांडल्या होत्या.

हे ही वाचा

…आशा सेविकांच्या ‘आशा’ आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर

कोरोनाच्या पार्शवभूमीवर पाथर्डी येथील आशा सेविका देत आहेत अविरत सेवा

‘आशा’ वर्करना हॉर्वर्ड विद्यापाठीच्या माध्यमातून प्रशिक्षण – राजेश टोपे

त्यानंतर आज अमित ठाकरे यांनी या समस्ये संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत अजित पवार यांनी पुढच्या कॅबिनेटमध्ये या संदर्भात निर्णय घेतला जाईल. असं आश्वासन अमित ठाकरे यांना दिलं आहे.

राज्यसरकार प्रथमच आशासेविकांना पहिल्यांदाच २००० रुपये राज्य सरकारच्या निधीतून देणार आहे. या अगोदर आशा सेविकेचं मानधन केंद्र सरकार करत होतं.

केंद्र सरकार अवघे (रु. १६००- रु. २५०० रुपयांचं मानधन देत होतं.. म्हणजे आशा सेविकांचं मानधनात वाढ झाल्यानंतर ते साधारण ४,००० च्या आसपास जाईल.

Updated : 23 Jun 2020 11:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top