...आशा सेविकांच्या ‘आशा’ आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर
Max Woman | 20 Jun 2020 2:31 PM GMT
X
X
सार्वजनिक आरोग्य खात्याच्या 'राष्ट्रीय आरोग्य अभियाना' अंतर्गत महाराष्ट्र राज्यात एकूण ७२,००० आशा स्वयंसेविका (Accredited Social Health Activist) व सुमारे ३५०० गटप्रवर्तक कार्यरत आहेत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या या आशा सेविकांनी (Asha Sevika) कोरोना संकटकाळात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावूनही त्यांना अत्यंत तुटपुंजे (रु. १६००- रु. २५००) मानधन दिले जात आहे.
हे ही वाचा
सर्वपक्षीय बैठक: सोनिया गांधी यांचे मोदी सरकारला थेट सवाल
ग्रामीण भागात महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार…
आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविका गेली पाच वर्षं शासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहेत. पण त्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही. म्हणूनच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांची भेट घेऊन आशा सेविकेच्या शिष्टमंडळाने आपल्या समस्या मांडल्या.
Updated : 20 Jun 2020 2:31 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire