Home > रिपोर्ट > आईच्या कुशीत जायचं होतं, पण....

आईच्या कुशीत जायचं होतं, पण....

आईच्या कुशीत जायचं होतं, पण....
X

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना एके कोरोना सुरुय...

अधूनमधुन येणा-या आत्महत्या,मृत्यु आणि शहिदांच्या बातम्या त्या ही नकारात्मकच...घरी, बाहेर, डोक्यात ही नकारात्मकता व्यापून राहिलीय असं वाटायला लागलं...दिवसभर बातम्या आणि त्यात आपल्याच

अडल्या-नडल्या मित्रांना आधाराचा हात देत होतो...

पण, आपल्या डोक्यावरुन फिरणा-या मायेच्या हाताची आठवण येतच होती...

आईची खुप आठवण येत होती...

आई सोबत असवी, तिच्या कुशीत जावं असं रोज वाटायचं.

रिपोर्टिंगच्या निमित्तानं आज कोकणात जायची संधी मिळाली आणि माझ्या मायेच्या घराची पायरी चढून कधी एकदा जातो असं झालं...मुंबईच्या दिडखणी खोलीतला जीव आधीच कोरोनाच्या भीतीनं घुसमटला होता...

कोकणातल्या ओल्या लाल मातीच्या वासानं मला माझ्या घराकडे खेचूनच नेलं...अचानक घरी जाऊन आईला सरप्राईज व्हिजिट दिली...

आई-बाबा दोघांच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा होता...

मार्च महिन्यापासून आई बाबा दोघेही कोकणात आहेत. बाळ घाबरुन दचकुन उठलं की कसं आईच्या ओढीनं तिच्या कुशीत जातं.... तशीच काहीशी अवस्था गेल्या काही दिवसांपासून माझी झाली होती. आईच्या कुशीत जाऊन मलाही तो प्रेमळ स्पर्श, मायेची ऊब हवी हेती... पण, आम्ही मुंबईहून कोकणात गेलो होतो...कोकणात घरी जातांना एरव्ही मुंबईहून पिशव्या भरभरुन केलेली शॉपींग घेऊन जायचो...पण आता मुंबईहून घरी जातांना आपण त्या आनंदाऐवजी घरी कोरोना तर घेऊन जाणार नाही ना? या नुसत्या शंकेनंही थरारलो...

हे ही वाचा

कोव्हीड योद्ध्यांना दिलासा, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नवीन सूचना

स्त्री-पुरुष नातं आणि दोन शब्द !!

कोण म्हणतं वस्ती घाण असते?

आईच्या कुशीत जायची ओढ तर आहे... पण, माझ्यामुळे आईला काही होणार नाही ना ही भिती वाटू लागली आणि अखेर अवघ्या १० मिनिटांची दुरूनच भेट घेत

जड अंतःकरणानं मुंबईची वाट पकडली..

आई बाबांच्या लांबूनच पाया पडलो त्यांनीही लांबूनच आशिर्वाद दिले पण हे आशिर्वाद कोरोनाची पुढची लढाई लढण्यासाठी पुष्कळ आहेत.

Misss u Mom&Dad

वैभव परब यांच्या फेसबुक वॉलवरून

Updated : 19 Jun 2020 10:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top