Home > News > देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ९४ हजारांच्या वर

देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ९४ हजारांच्या वर

देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ९४ हजारांच्या वर
X

देशात कोरोनाच्या (covid- 19) नवीन रुग्णांची संख्या २४ तासात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एका दिवसात कोरोनाचे १२ हजार ८८१ नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतचा हा उच्चांक ठरला आहे.

तर ३३४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १२ हजार २३७ झाली आहे. तर कोरोनाबाधीत एकूण रुग्णांची संख्या ३ लाख ६६ हजार ९४६ एवढी झाली आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे यापैकी १ लाख ९४ हजार ३२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

हे ही वाचा

मुलींचं शिक्षण धोक्यात…

चीनची घुसखोरी रोखणं सैन्याचं काम होतं ! आजतक चॅनल काय म्हणतं पाहा !

सुशांत सिंहच्या आत्महत्येला जबाबदार कोण? जितेंद्र आव्हाड यांची चौकशीची मागणी

तर १ लाख ६० हजार ३८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या ३ दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या ११ हजारांच्या खाली नोंदवली जात होती. पण आज १३ हजारांच्या जवळपास ही संख्या नोंदवली गेली आहे.

Updated : 18 Jun 2020 5:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top