Home > News > चीनची घुसखोरी रोखणं सैन्याचं काम होतं ! आजतक चॅनल काय म्हणतं पाहा !

चीनची घुसखोरी रोखणं सैन्याचं काम होतं ! आजतक चॅनल काय म्हणतं पाहा !

भारत-चीन दरम्यान तणाव आणखी वाढल्यानंतर हिंदी वृत्तवाहिन्यांच्या वार्तांकनावरुन चर्चा सुरू झाली आहे. पण आज तक या हिंदी चॅनेलवरील एका महिला अँकरने केलेले वक्तव्य धक्कादायक आहे, पाहा राज असरोंडकर यांचे विश्लेषण

चीनची घुसखोरी रोखणं सैन्याचं काम होतं ! आजतक चॅनल काय म्हणतं पाहा !
X

रोहित सरदानाला विषय शेकवायचा होता भाजपा विरोधकांवर आणि दाखवायचं होतं की विरोधक भारतीय सैन्याच्या शौर्यावर शंका घेतायंत. पण श्वेता सिंगने रोहितच्या मनसुब्यांवर पाणी फिरवलं. ही तीच श्वेता सिंग आहे, जिने नोटाबंदीच्या काळात नोटेतल्या चीपची धादांत खोटी बातमी बेधडकपणे सांगितली होती. मनोविश्लेषणाचा ज्यांना अभ्यास आहे तेही सांगतील की आपण खोटं बोलतोय, हे श्वेता सिंगला माहित होतं, हे तिच्या देहबोली, हावभावांवरून स्पष्ट दिसतं.

आजही तिची तीच अवस्था आहे. बळेच ती मोदी सरकारची बाजू घेतेय. त्याबद्दल कोणास आता आश्चर्यही वाटणार नाही आणि वावगंही वाटणार नाही. देशाला सवय झालीय. पण यावेळी ती सरकारची चाटुकारिता करता करता चीनच्या घुसखोरीबद्दल थेट भारतीय सैन्यालाच दोष देऊन मोकळी झालीय. तोही किती बेमालुमपणे पाहा ! भाजपाईंची देशभक्ती अनेकदा उघडीनागडी पडलीय. पण यावेळी ती देशाच्या सैन्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करतेय.

हे भारतीय सैन्याचं खच्चीकरण आहे. हा खरा देशविरोध आहे. या घातक प्रवृत्तींचा जोरदार विरोध व्हायला हवा. या ढोंगी देशभक्तीचा मी जाहिरपणे निषेध करतो. श्वेता सिंगने भारतीय सैन्याची आणि देशाची माफी मागायलाच हवी.‌

#WeTrustOurIndianMilitary

Updated : 17 Jun 2020 3:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top