Home > रिपोर्ट > कौटुंबिक दु:खातही रुपाली चाकणकरांचा 'हा' कौतुकास्पद निर्णय

कौटुंबिक दु:खातही रुपाली चाकणकरांचा 'हा' कौतुकास्पद निर्णय

कौटुंबिक दु:खातही रुपाली चाकणकरांचा हा कौतुकास्पद निर्णय
X

कोरोना व्हायरस (Corona Virus) प्रादुर्भाव राज्यात वाढतो आहे. प्रशासनाकडून वारंवार घरात राहण्याची सुचना देऊनही नागरिक बिनदिक्कतपणे घराबाहेर वावरत आहेत. असा नागरिकांसाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा प्रसंग ओढावलेला असतानाही सामान्य जनतेसाठी एक उत्तम संदेश दिला आहे.

हे ही वाचा..

१८ मार्ज रोजी बुधवारी रुपाली चाकणकर यांच्या मोठ्या जाऊबाईंचं अल्पशा आजाराने निधन झालं. त्यानिमित्ताने करण्यात येणाऱ्या दशक्रिया विधी आणि तेरावा विधी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अत्यंत घरगुती स्वरुपात करण्याचा निर्णय घेत त्यांनी जनतेसाठी एक उत्तम संदेश दिला आहे.

"आपण सर्वजण आमच्या सुखात तसेच दु:खात कायम सहभागी राहिला आहात. एकत्र कुटुंबातील सर्वात मोठा असलेला नातेवाईक, सगेसोयरे व मित्रपरिवार यांचा गोतावळा कायमच आमच्या चाकणकर परिवारात प्रत्येक क्षणाला पाठीशी उभा राहिला. पण, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आपण गर्दी टाळावी. या हेतुने हा निर्णय घेण्यात आला आहे.” अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी आपल्या फेसबुक पेजवर दिली आहे. दु:खाच्या क्षणीही सामाजिक भान राखुन निर्णय घेतल्याबद्दल रुपाली चाकणकर यांनी घेतलेला हा पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे.

Updated : 20 March 2020 11:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top