CoronaVirus- ‘बॅबी डॉल’ फेम कनिका कपूरला कोरोनाची लागण
X
‘बॅबी डॉल’ फेम गायिका कनिका कपूर (Kanika Kapoor) हिला कोरोनाची लागण लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी ती लंडनवरून परतली होती. वैद्यकीय तपासणीत तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल असून सध्या तीला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर ती एका मोठ्या हॉटेलमध्ये थांबली होती, एवढचं नाहीतर तिने डिनर पार्टीही ठेवली असल्याची माहिती समोर येतेय. यादरम्यान कनिका कपूरच्या संपर्कात आलेल्यांची चांगलीच भांबेरी उडाली असून यात वसुंधरा राजे यांचा मुलगा आणि भाजप खासदार दुष्यंत सिंह (Dushyant Singh) यांचही नाव समोर यात आहे. कनिकाने दिलेल्या पार्टीत त्यांचाही सहभाग असल्यामुळे राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आलंय.
कनिका कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही एक पोस्ट शेअर केली असून त्यात आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचंही स्पष्ट केलं आहे. कनिका कपूर म्हणजे, बॉलिवूडमधील एक नामांकित नाव आहे. कनिकाने 'बेबी डॉल मैं सोने दी' हे प्रसिद्ध गाणं गायलं आहे. याव्यतिरिक्त काही रिअॅलिटी शोमध्ये कनिका जज देखील होती.