Home > रिपोर्ट > ‘तुम्ही नेहमीच कुपोषित दिसता’ रुपाली चाकणकरांचा चंद्राकांत पाटलांना टोला

‘तुम्ही नेहमीच कुपोषित दिसता’ रुपाली चाकणकरांचा चंद्राकांत पाटलांना टोला

‘तुम्ही नेहमीच कुपोषित दिसता’ रुपाली चाकणकरांचा चंद्राकांत पाटलांना टोला
X

भाजप सत्तेत असताना मागची पाच वर्षे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपाशी असल्यासारखे बसले होते अशी बोचरी टीका करणाऱ्या भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी चांगलाच पलटवार केला आहे. आमचं जनता ठरवेल, तुम्ही मात्र नेहमीच कुपोषीत दिसता असा टोला चाकणकर यांनी चंद्रकांत पाटलांना लगावलाय.

शिवसेनेचं हे ठरलं होत की, काहीही करून मुख्यमंत्री बनवायचा. कितीही जागा कमी आल्या तरी पहिला मुख्यमंत्री त्यांचाच असेल हे ठरलं होतं. भाजपाला दूर करायचं ठरलं होतं अस मी म्हणणार नाही. त्यांचा असा प्रयत्न होता की, मिळालं तर भाजपाकडून. नाही मिळालं तर सुटी. दुसरं कुणीतरी. दुसरं कोण तर शरद पवार. ते बसलेच होते. पाच वर्षे उपाशी बसल्यासारखं,’ असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमादरम्यान केलं.

या मुलाखतीत त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही बोलताना चांगलेच तोंडसु:ख घेतले. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधताना त्यांच्यावर पी. एचडी करण्याची इच्छा बोलून दाखवली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अ‌ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री आहेत त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे असा टोला लगावला.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या या वक्तव्यावर रुपाली चाकणकर यांनी आमच्या पक्षाचा जन्मच सत्तेत झाला आहे. आम्ही उपाशी आहोत की नाही हे जनता ठरवेल,तुम्ही मात्र नेहमीच कुपोषित दिसतायत.असा टोला लगावला आहे.

सूर्याच्या तेजामुळे वैफल्यग्रस्त झालेली माणसे मग सूर्यावर थुंकायला लागतात..लक्षात ठेवा अजून जवळ याल तर कधी कोळसा होईल सांगता येणार नाही.असा इशाराही त्यांनी यावेळी पाटील यांनी दिला.

Updated : 16 March 2020 12:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top