Home > रिपोर्ट > जितेंद्र आव्हाडांच्या मुलीसंबंधित खोटी बातमी लावणाऱ्या आणखी एका चॅनेलला दणका

जितेंद्र आव्हाडांच्या मुलीसंबंधित खोटी बातमी लावणाऱ्या आणखी एका चॅनेलला दणका

जितेंद्र आव्हाडांच्या मुलीसंबंधित खोटी बातमी लावणाऱ्या आणखी एका चॅनेलला दणका
X

‘फेक न्यूज’पसरवल्याप्रकरणी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना पोलिसांनी अटक केली आहे. आता आणखी एका चॅनेलच्या पत्रकार आणि अँकरवर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिले आहेत.

एका वृत्तवाहिनीने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याबाबत एक वृत्त १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध केलं होतं. यात आव्हाड हे कोरोनाबाधित आहे असं सांगण्यात आलं. यासोबत आव्हाड यांची मुलगी १६ मार्च रोजी स्पेनहून भारतात परतली. ती कोरोना पॉझिटिव्ह होती. त्यानंतर आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली असा दावा या बातमीत करण्यात आला होता.

हा दावा खोटा असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. या चॅनेलने कोणत्याही रुग्णाचं नाव जाहीर न करण्याचा आचारसंहितेची पायमल्ली केली आहे. चॅनेलचं वर्तन गैरजबाबदार आणि हेतुपुरस्सर केलेलं आहे. देशात भीतीचं वातावरण असताना घबराट पसरावणाऱ्या बातम्या दाखवणं चुकीचं आहे असं म्हणत बातमी देणाऱ्या पत्रकार आणि निवेदक या दोघांवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.

Updated : 16 April 2020 8:02 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top