Home > रिपोर्ट > 'मुंबईचं इटली होणार, योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज'

'मुंबईचं इटली होणार, योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज'

मुंबईचं इटली होणार, योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज
X

मुंबईतील वांद्रे पश्चिम (Bandra Crisis) येथे लॉकडाऊनचे नियम धाव्यावर बसवून स्थलांतरीत कामगारांचा (Migrant) हजारोंच्या संख्येने जमाव गोळा झाला होता. यावरुन बॉलीबुड अभिनेत्री कंगणा रणावत हिची बहिण रंगोली चंदेल (Rangoli Chandel) हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधत मुंबईची इटली होणार असं म्हणत त्यांची तुलना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी केली आहे.

रंगोली सोशल मीडियावरील आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. ती भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची खंदी समर्थक असल्यांचं यापुर्वीच्या अनेक ट्वीट मधून तीने स्पष्ट केलं आहे.

कोरोना व्हायरस च्या रुग्णांची सर्वाधिक संख्या मुंबईत असून सरकारने काटेकोरपणे लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन केले आहे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये वाढ झाली असून ३ मे पर्यंत हा कालावाधी वाढवण्यात आलाय. अशा परिस्थितीत हजारो नागरिक जमा होणे फारच धोकादायक आहे.

या घटनेनं आत राजकीय वळण घेतलं असून राज्य विरुद्ध केंद्र सरकार असा वाद उफाळला आहे. या वादात रंगोली हिने ‘मुंबईचं इटली होणार. पुढे आणखी आव्हानं येतील. या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे’ असं ट्वीट करुन उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्षमतेवर एकप्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Updated : 15 April 2020 8:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top