Home > Max Woman Blog > लॉकडाऊन : बेघर स्त्रीयांचे प्रश्न

लॉकडाऊन : बेघर स्त्रीयांचे प्रश्न

लॉकडाऊन : बेघर स्त्रीयांचे प्रश्न
X

‘मीरा’ रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या पुलाखाली राहते. लहानपणी आईवडील वारले. आईवडील नाही त्यामुळे नातेवाईकांनीही जवळ केलं नाही. मावशीकडे काही दिवस राहिली पण तिथे तिच्यासोबत काकाने जबरदस्ती केली म्हणून मावशीने तिलाच घराबाहेर काढले. डोक्यावर असलेलं एकमेव छप्पर हिरावलं गेल. कोठे जायचे काय करायचे हे माहित नाही. भूक लागत होती, काय करावं कळेना म्हणून पोट भरण्यासाठी भीक मागायला सुरुवात केली. रात्री ज्या ठिकाणी कोणी हाकलून देणार नाही अशा ठिकाणी चार पाच दिवस काढले. रस्त्यावर भीक मागून जगत असतांना राजू या पुरुषाच्या संपर्कात आली. तिला तो राहत असलेल्या पूलाखाली घेऊन गेला. त्याच पूर्ण नाव, काय करतो हे तिला माहीत नाही.

हे ही वाचा...

मीरा सांगते, "वो साथ था तब खाने को मिल जाता था. फिर हम जोरू मर्द जैसे रहेने लगे. एक बच्चा हुआ. वो खाने का देखता था, तो इतनी फिकीर नही थी’. मैने भी फूल, खिलोने बेचने का काम शुरू किया. ब्रीज के नीचे जगह मिल गई थी. तो वही चुल्हा बनाकर खाना भी पका ती थी. मेरा बेटा, मै कट रही थी हमारी जिंदगी. एक दिन बाहर गाव जाकर आता हू बोला. आज तक वापस नही आया. पता नही क्यो छोडकर चला गया." मीरा आणि तिचा मुलगा गेल्या वर्षभरापासून त्याची वाट पाहत आहे.

हे ही वाचा...

मीरा म्हणते, राजू जाने के बाद मुझे पुरा टाईम काम करना पडता है. बेटा मेरा छोटा है, तो उसको साथ लेकर जाती हू. भंगार जमा करके रोज कभी १५० कभी २०० रुपये कमा लेती थी. ‘ये बंद नही था तो भंगार का सामान जमा करके बेचकर कुछ ना कुछ पैसा मिलता था. मेरा और बेटे का गुजारा हो जाता था’. उसको चाय के साथ दो पाव खिला देती तो उसका दिनभर का काम हो जाता था. मे चाय के साथ वडा पाव खा लेती हू. स्टेशन का हॉटेलवाला रोज को कुछ बचता था खाने को देता था. रात का हम मा बेटे का पेट भर जाता था. अभी हॉटेल भी बंद है. अब सारा काम बंद पडा है तो भंगार जमा करने जा भी नही सकते. फिरभी चोरी छुपे जाती हू तो पोलिस चिल्लाती है. अभी तो एक टाईम खाने को भी मोहताज हो गये है. ये महामारी कब खत्म होगी पता नही.

दिल्लीच्या बेघर निवारा गृहात राहणारी बीणा. मूळ कानपूरची. लग्न झाल्यानंतर पतीसोबत दिल्लीला रोजगारासाठी आली. दिल्लीच्या भोगल भागात असलेल्या वस्तीत राहत होते. पण एका अपघातात पतीचा मृत्यू झाला. घरी वापस जाण्याचा विचार केला पण सासर आणि माहेर दोन्ही घराचे दरवाजे तिच्यासाठी बंद झाले. दिल्लीत राहून कधी कचरा गोळा करणे, कधी फूल विकणे हे काम केलं. एका व्यक्तीच्या संपर्कातून एका कंपनीमध्ये ऑफिस सफाई करण्याचं काम मिळालं. या कामाचे तिला रोज १०० रुपये मिळायचे. राहिलेल्या वेळात भोगलमध्ये असलेल्या साई मंदिराबाहेर फूल विकण्याचे काम करायची. महिन्याभरात ५०००-६००० रुपये कमावत असे. बाकीचा सगळा खर्च स्वत:ला करावा लागतो. त्यामुळे हाती काही शिल्लक राहत नसलं तरी तिच्या एकटीचं बर चालल होतं. बेघर निवारा गृहात तिला रात्री राहण्याची सोय झाली होती. काही लोकांनी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात दिलेले धान्य आता पर्यंत जपून वापरले आहे. पण, पुढचे दहा बारा दिवस काय करायचे. खायचे काय हा प्रश्न तिच्या समोर उभा आहे. लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार ठप्प झाले.

कोरोना लॉकडाऊनने जगातील एका वर्गाला घरात बसवले आहे तर दुसर्‍या वर्गाला रस्त्यावर आणले आहे. ही स्थिती जागतिक स्थिती आहे. देशातील जो वर्ग रस्त्यावर लॉकडाऊन झाला आहे त्यात अनेक वर्षापासून रस्त्यावर राहणार्‍या लोकांच्या अडचणीत भर घातली आहे. यात स्थलांतरित कामगार आणि बेघर लोकांची मोठी संख्या आहे. ‘बेघर’ ज्यांना राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे घर नाही. किंवा शहरे झोपडपट्टी मुक्त करायचे म्हणून त्याचे असलेले घर पाडण्यात आले आहे. वर्ष २०१७ मध्ये शासकीय यंत्रणेकडून ५३,७०० घर पाडण्यात आली, ज्यामुळे २६०, ००० लोक बेघर झालीत.

परिणामी, ही लोकं प्रामुख्याने रस्ते, रेल्वे स्टेशन, बस स्टँड, फुटपाथ, ओसाड जागा , उड्डाण पूलांच्या खालील जागा, मोठे पाईप अशा ठिकाणी राहतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इकॉनॉमिक अँड सोशल अफेयर्सच्या सोशल इनक्लूजन अहवालाच्या आकडेवारीनुसार जगात १.६ बिलियन लोक बेघर आहेत.

लॉकडाऊनमुळे या बेघर लोकांचे आणि प्रामुख्याने स्त्रिया आणि मुलीच्या समस्यात वाढ झाली आहे. बेघर म्हणून जीवन जगताना स्त्रिया आणि मुलींना विनयभंग, बलात्कार, पळवून आणणे किंवा पळवून नेने, अनैतिक मानवी वाहतूक, अश्लील भाषेतून होणारी मानहानी अशा अनेक गोष्टींना दैनंदिन जीवनात सामोर जाव लागत असत. शिवाय जागे अभावी स्वत:ची वैयक्तिक काळजी घेता येत नाही. मासिक पाळीच्या दिवसात कापड मिळत नाही. त्यामुळे अनेक वेळा आजारपणातून जावं लागत. कोणत्याही प्रकारची सुरक्षा, सुरक्षित वातावरण मिळतं नाही.

बींना सारख्या स्त्रियांच्या जीवनात एखादे छोटेसे काम करून ठीकठाक आयुष्य वाट्याला येते त्यांच्याकडूनही कोरोनाच्या लॉकडाऊनने हा हक्क हिरावून घेतला जात आहे. मीरा, बींना सारख्या हजारो बेघर स्त्रिया आणि मुलीसमोर आता जगायचे कसे हा प्रश्न आहे. ३ मेला ही लॉकडाऊन संपलं नाही तर माझ्या मुलाचं काय होईल ही चिंता मीराला आहे. तर बींना म्हणते लॉकडाऊन संपल्यानंतर जगण्याचा संघर्ष पुन्हा नव्याने सुरू करावा लागणार आहे. फूल विकण्यासाठी खरेदी करता हातात पैसाच उरला नाही. आता जवळ फक्त २० रुपये आहेत. कंपनी परत कामावर येऊ देईल का नाही माहित नाही अशी स्थिती आहे.

-रेणुका कड

Updated : 21 April 2020 3:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top