Home > हेल्थ > जटील शस्त्रक्रियाकरुन डॉक्टरांनी दिली तिला मातृत्वाची संधी

जटील शस्त्रक्रियाकरुन डॉक्टरांनी दिली तिला मातृत्वाची संधी

जटील शस्त्रक्रियाकरुन डॉक्टरांनी दिली तिला मातृत्वाची संधी
X

करोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे रुग्णालयांवर आणि डॉक्टरांवर कामाचा ताण वाढ आहे. मात्र या कठीण प्रसंगातही डॉक्टर त्यांचं कार्य चोख पार पाडत आहेत.

तुमसर येथील रुग्णालयात एका २८ वर्षीय अविवाहित तरुणीवर जटिल शस्त्रक्रिया करून गर्भ पिशवी ला कसलीही हानी न पोहचवता तिच्या पोटातून अंदाजे २ किलोग्राम वजनाचे गोळा काढून त्या अविवाहित तरुणीला विवाहानंतर मातृत्वाची संधी मिळाली आहे.

हे ही वाचा

नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे पक्षाचा छुपा अजेंडा राबविण्याची नीती – वर्षा गायकवाड

‘ती पार्थची वैयक्तीक भूमिका…’ – सुप्रिया सुळे

तुमसर तालुक्यातील देव्हाडी येथील २८ वर्षीय तरुणी च्या पोटात मागील 3 वर्षा पासून दुखण्याचे त्रास जाणवत होते पोटाची सोनोग्राफी केल्या नंतर तिच्या पोटात मासाचा गोळा असल्याचे दिसले दरम्यान शस्त्रक्रिया न करता होमोपॅथिक औषधी ने गोळा काढता येते म्हणून त्या तरुणीने सतत तीन वर्ष होमोपॅथिक ची औषधे खाल्ली मात्र पोटातील गोळा कमी न होता तो वाढतच गेला व तो गोळा एवढा वाढला की ७ महिन्याचे गर्भ जसे दिसून येते तसे त्या तरुणी चे पोट दिसून येत होते.

तरुणीच्या पोटातून तिच्या गर्भ पिशवी कसलीही हानी न होऊ देता २४ x ३०सेमी आकाराचा गोळा अलगद बाहेर काढून यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने त्या तरुणीला विवाह नंतर मातृत्वाची संधी मिळाली चे समाधान असल्याचे डॉ सौरभ कुंभारे सांगितले.

Updated : 10 Aug 2020 11:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top