Home > हेल्थ > या पावसाळ्यात वजन वाढवण्यासाठी काही टिप्स

या पावसाळ्यात वजन वाढवण्यासाठी काही टिप्स

या पावसाळ्यात वजन वाढवण्यासाठी काही टिप्स
X

आरोग्यदायी राहण्यासाठी गरजेचे आहे ते म्हणजे वजन व्यवस्थित असणं . काही लोकांचे वजन हे फार कमी तर काहींचे खूप जास्त असतं . त्यामुळे अनेक प्रयत्न करूनही आपण व्यवस्थित दिसत नाही याचं नैराश्य अनेकांना येत . सध्याच्या धावपळीच्या जगण्यात तर माणूस वेळ मिळेल तिथे निकृष्ट दर्जाचं अन्न सुद्धा खातो . आणि याचे अनेक परिणाम शरीरावर होतात . त्यापैकी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे वजन. पण वजन कमी असलं तर काय खावं ?काय प्यावं ?काहीच समजत नाही . पण जर तुम्ही काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय केलेत तर त्याचा चांगला फरक पडू शकतो .वजन वाढीबरोबरच योग्य आहारासाठी काही आयुर्वेदिक टिप्सची तुम्हाला मदत होऊ शकते.

झोप आणि आराम

आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे झोप . काही वेळा माणूस हा सतत काम करत राहतो आणि आराम घेणं विसरून जातो . त्यामुळे वजन वाढत नाही . आणि त्यामुळे पचनसंस्था बिघडते . परिणामी वजन वाढत नाही . त्यामुळे रोजच्या कामाचे नियोजन करून व्यवस्थित आराम घेणंही तितकंच आवश्यक आहे.

वेळेवर खाणे आवश्यक

प्रत्येकाच्या जेवणाच्या वेळा या वेगवेगळ्या आहेत. पण सहसा दिवसभरातून ३ वेळेस भोजन करणं केंव्हाही चांगलं . पण या जेवणात जर तुम्ही प्रोटीनचा समावेश केलात तर निश्चितच वजन वाढण्यास मदत होऊ शकते. जर तुम्ही दिवसातून असे नियोजन केलात तर वजन झपाट्याने वाढू शकते .

या झाल्या सर्वसाधारण गोष्टी ज्या आपण सहज करू शकतो . पण जर आपल्या खाण्यात जर पुढील गोष्टींचा समावेश केला तर अजून फायद्याचे ठरू शकते .

१)सोयाबीन

सोयाबीनमध्ये सोडियम ,पोटॅशियम ,फायबर आणि लोह याचा समावेश आहे. आणि यामुळेच शरीरातील थकवा दूर होण्यासह वजन वाढण्यास मदत सुद्धा होते. सोयाबीन हा प्रथिनांचा मुख्य स्रोत मानला जातो . त्यामुळे तुमच्या हेल्दी डायट मध्ये सोयाबीनचा समावेश करा.

२)तूप

तुपाच्या सेवनाने वजन वाढवणं खूप सहज होतं . तूपामुळॆ वजन तर वाढतेच पण भूक सुद्धा वाढण्यास मदत होते. वाताची समस्या सुद्धा तुपाच्या सेवनाने कमी होते .

३)अश्वगंधा पावडर

अश्वगंधाच्या सेवनाने वजन वाढण्यास मदत होते . पण या पावडरचे सेवन कसे करावे ?

१ ग्लास कोमट दुधात १ चमचा अश्वगंधा पावडर मिक्स करा . त्यामध्ये तूप टाकलात तर उत्तमच . असे दूध दररोज सेवन केल्याने झपाट्याने वजन वाढू शकते .

या होत्या काही अश्या टिप्स ज्यामुळे तुम्ही वजन वाढवू शकता आणि हेल्दी डायट सुद्धा सेवन करू शकता .

Updated : 8 July 2023 10:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top