चक्क! नवजात बाळांचं नाव कोराना कुमार आणि कोरोना कुमारी
X
जगाच्या इतिहासात कोरोना चं (Covid-19) महासंकट हे आतापर्यंतचे सर्वात भयंकर महासंकट ठरले आहे. पुढची अनेक वर्ष या संकटाचे परिणाम जाणवत राहणार आहेत. पण आंध्रप्रदेशातील दोन कुटुंबांमध्ये तर आता चक्क कोरोना कुमार (Corona Kumar) आणि कोरोना कुमारी (Corona Kumari) जन्माला आले आहेत.
हे ही वाचा...
- CoronaVirus Update: राज्यातील रुग्णांचा आकडा हजारापार; मृत्यूची संख्या ६४
- Coronavirus : लॉकडाऊनमुळे पुरुषी अहंकाराचा चष्मा उतरला का?
- CoronaVirus: मनाचं लॉकडाऊन उघडण्यासाठी फोनवर समुपदेशन
आंध्रप्रदेशात लॉकडाऊनच्या (LockDown) काळात प्रसुती झालेल्या दोन महिलांनी आपल्या मुलांना कोरोनाचे नाव दिले आहे. कडापा जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या खेड्यांमधील या महिला आहेत. तलापल्ली या गावातील शशिकला या महिलेला २९ मार्च रोजी प्रसुती वेदना सुरू झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, तर याच गावाजवळच्या अलीरेड्डीपल्ली या गावातील रमादेवी या महिलेला ५ एप्रिल रोजी त्याच हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले होते.
शशिकला या महिलेला मुलगी झाली तर रमादेवीला मुलगा झाला. कोरोनाच्या संकट काळात ही मुलं जन्माला आली म्हणून त्यांना कोरोनाचे नाव देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आणि तो मान्य करत शशिकलाने तिच्या मुलीचे नाव कोरोना कुमारी तर रमादेवीने तिच्या मुलाचे नाव कोरोना कुमार ठेवले आहे.