Home > Max Woman Blog > Coronavirus : लॉकडाऊनमुळे पुरुषी अहंकाराचा चष्मा उतरला का?

Coronavirus : लॉकडाऊनमुळे पुरुषी अहंकाराचा चष्मा उतरला का?

Coronavirus : लॉकडाऊनमुळे पुरुषी अहंकाराचा चष्मा उतरला का?
X

करोनाच्या निमित्ताने लॉकडाऊन स्वीकारावे लागल्यामुळे सक्तीने घरात बसावे लागतेय. अशा वेळेस अनेक पुरुष घरकाम करायला लागल्याचे चित्र दिसते. आणि ते काहीशा अभिमानाने फेसबुक, व्हाट्सअपवर घरकाम केल्याचे फोटो टाकत असतात. निदान या काळात तरी पुरुषांच्या लक्षात आलेच असेल की, बायको दिवसभर घरी असूनही रिकामी नसते तर भरपूर काम करत असते. त्यामुळे यापुढे तरी बायकोला कधी 'तू तर घरातच असतेस, तू काय काम करतेस?' असे तुच्छतादर्शक प्रश्न विचाणार नाहीत. बाहेरचे पगार देणारे ऑफिस म्हणजेच काम आणि घरकाम म्हणजे शून्य काम! हा गैरसमज पुरुषाच्या डोक्यातून आता निश्चितच गेला असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

मी अनेक वर्षे एक स्वयंपाक करणे सोडले तर कपडे वाळत घालणे, वाळलेल्या कापड्यांच्या घड्या करून ते जगाच्या जागी ठेवणे, भांडी धुणे आणि ती सुकल्यावर योग्य जागी ठेवणे, चहा करणे, मटार सोलणे, कोळीष्टके काढणे, झाडू मारणे, अशी अनेक घरकामे करत आहे. कारण आमच्या आईने लहानपणापासून ही कामे मुलांची आणि ही कामे मुलीची अशा पद्धतीने संस्कार केले नाहीत.

पण एकत्र कुटुंब पद्धतीमुळे घरात आई, काकी, आजी, बहीणी अशा अनेक स्त्रिया असल्यामुळे लहानपणापासून स्वयंपाक शिकायचे राहून गेलेच. तरीही भाताचा कुकर लावणे, ऑम्लेट करणे असे काही प्रयत्न चालू असतात. या सगळ्यातून एक गोष्ट निश्चित लक्षात आली, ती म्हणजे कोणते काम मनापासून केले त्याचा कधी कंटाळा येत नाही, आणि त्याचे ओझेही वाटत नाही. त्यासाठी गरज आहे ती पुरुषी अहंकार बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने स्त्री-पुरूष समानता आचरणात आणण्याची.

या पोस्टच्या निमित्ताने हे लिहिले. पुरुषांनी घरकाम करणे ही काही फुशारकीने सांगण्यासारखी गोष्ट नाही, तर हे आपल्या आयुष्यातील अनेक कामांपैकी एक काम आहे, असे मला वाटते. आपल्याला?✍️JK

साभार : जगदीश काब्रे यांच्या फेसबुक वॉल वरून

Updated : 7 April 2020 6:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top