Home > हेल्थ > खासदार नवनीत राणा यांच्या प्रकृतीत बिघाड, अधिक उपचारासाठी नागपूरला हलविले

खासदार नवनीत राणा यांच्या प्रकृतीत बिघाड, अधिक उपचारासाठी नागपूरला हलविले

खासदार नवनीत राणा यांच्या प्रकृतीत बिघाड, अधिक उपचारासाठी नागपूरला हलविले
X

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना नागपूरला हरवल्याचे वृत्त समोर येत आहे. नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. नुकताच त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या दरम्यान सुरु असलेल्या उपचारावेळी त्यांची तब्येत बिघडली.

नवनीत राणा यांच्यासह पती आणि आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे असे कुटुंबातील 12 जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. जवळपास सहा दिवसांपूर्वी नवनीत राणा यांचा अहवाला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये आधीपासूनच उपचार सुरु आहेत.

हे ही वाचा

नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे पक्षाचा छुपा अजेंडा राबविण्याची नीती – वर्षा गायकवाड

‘ती पार्थची वैयक्तीक भूमिका…’ – सुप्रिया सुळे

आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं कळल्यावरगेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही नवनीत राणा यांनी केले होते.

Updated : 11 Aug 2020 4:47 AM GMT
Next Story
Share it
Top