मुलांच्या ऑनलाईन शाळांचे तास कमी होणार?

Update: 2020-06-12 17:38 GMT

कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे यंदा शाळा वेळेवर सुरू होऊ शकलेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शाळा व्यवस्थापनांनी ऑनलाईन शाळा ( online school ) सुरू केल्या आहेत. पण आता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने दररोज किती ऑनलाईन तास असावे याची चर्चा सुरू झाली आहे.

हे ही वाचा

….म्हणून एकता कपूर ने ट्रिपल एक्स 2 मधील सैन्याशी संबंधित वादग्रस्त सीन हटवले

कोरोनाला आळा घालणारा अमरावती पॅटर्न

यासंदर्भात मुलांच्या वयानुसार त्यांनी किती तास Online अभ्यास करावा याबाबत मार्गदर्शक तत्व तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. शिक्षण विभागाने यासंदर्भात मार्गदर्शक तत्वांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. २२ महिन्यांचा Pre - primary चा मुलगा ३ तास कसा ऑनलाईन बसू शकतो, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

दरम्यान मुलांच्या वयानुसार ऑनलाईन शाळांचे तास ठरवले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

3-4 वर्षांच्या मुलांसाठी १ तास

5-6 वर्षांच्या मुलांसाठी २ तास

6 वर्षांच्यावरील मुलांसाठी ३ तास

Online अभ्यासाचा मुलांच्या डोळ्यावर परिणाम होतो आहे, याबाबत देखील विचार करायला हवा, मुलांवर मोबाईलच्या माध्यमातून किती ओझं टाकणार असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

Full View

Similar News