Whatsapp चं भारतीय महिलांना गिफ्ट, Bol behan म्हणत साधणार संवाद!

Whatsapp महिलांना म्हणतंय बोल बहन! महिलांची करणार मदत

Update: 2022-04-03 06:46 GMT

 Whatsapp आपल्या युझर्ससाठी नेहमीच काहीतरी नवनवीन गोष्टी आणत असतं. पण यावेळी कंपनीने विशेषतः आपल्या महिला युझर्सना लक्षात घेऊन एक अतिशय खास फीचर आणण्याची घोषणा केली आहे. कंपनीने भारतीय महिलांसाठी AI आधारित चॅटबॉट आणला आहे ज्याला 'बोल बेहेन' असे नाव देण्यात आले आहे. यासाठी व्हॉट्स 'नॉन-प्रॉफिट गर्ल इफेक्ट' सोबत भागीदारी केली आहे.

नेमकं कसं असणार आहे हे चॅटबॉट?

नॉन-प्रॉफिट गर्ल इफेक्टसोबत भागीदारी केल्यानंतर, व्हॉट्सअॅपने भारतातील महिला आणि युवतींसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित चॅटबॉट 'बोल बेहेन' लॉन्च करण्याची घोषणा केलीये. या चॅटबॉटवर महिलांना आरोग्यविषयक माहिती मिळणार आहे. इतकंच नाही तर या चॅट फॉरमॅटची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, महिलांना आरोग्य, लैंगिकता आणि नातेसंबंध या विषयांची माहिती इथे मिळू शकेल. हा चॅटबॉट हिंग्लिश म्हणजेच इंग्रजी आणि हिंदी भाषेच्या मिश्रणाने तयार करण्यात आला आहे.

चॅटबॉटसाठी नेमका 'या' नंबरवर कारावा लागेल मेसेज?

तुम्हालाही बोल बेहेन चॅटबॉट वापरून कोणतीही माहिती मिळवायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला +९१-७३०४४९६६०१ हा नंबर मोबाइलमध्ये सेव्ह करावा लागेल. नंतर या नंबरवर Hi चा मेसेज पाठवा. विशेषत: भारतातील हिंदी पट्ट्यातील किशोरवयीन मुली आणि महिलांना लक्षात घेऊन हा चॅटबॉट तयार करण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. जे सहसा लोडेड एंड स्मार्टफोन वापरतात. याद्वारे महिलांना अनेक महत्त्वाची माहिती मिळू शकणार आहे.

चॅटबॉट नेमकं काम कसं करेल?

व्हॉट्सअॅपवर बोल बेहेन चॅटबॉट मर्यादित युझर्ससाठी सादर करण्यात आला आहे आणि ते सध्या फक्त बीटा आवृत्तीवर वापरला जाऊ शकते. चांगली गोष्ट म्हणजे बोल बेहेन चॅटबॉट मोबाईल आणि वेब दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध असेल. ते वापरण्यासाठी चॅटबॉटचा नंबर सेव्ह केल्यावर त्या नंबरवर Hi चा मेसेज पाठवावा लागेल. ज्यानंतर उत्तर येताच तुम्हाला महिलांशी संबंधित कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मिळू शकतं.

Tags:    

Similar News