या वर्षी Tesla Car भारतात लॉन्च होणार? किंमत 35 लाख..

Update: 2021-12-04 03:17 GMT

टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी भारतात इलेक्ट्रिक कार आणणार असल्याची घोषणा करून आज जवळपास एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र आज अजून गाडी भारतात लॉन्च झालेली नाही. त्यामुळे ही गाडी या वर्षी भारतात खरेदीसाठी उपलब्ध होईल असं आता म्हंटल जात आहे. देशातील श्रीमंत आणि प्रसिद्ध लोक या कारची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण सरकार आणि इलॉन मस्क यांच्यातील आयात शुल्काचा वाद ही प्रतीक्षा आणखीनच वाढवत आहे. गेल्या महिन्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टेस्ला कारची भारतात सुमारे 35 लाख रुपये किंमत असल्याची माहिती दिली होती. टेस्ला 2021 मध्ये अनेक ठिकाणी मॉडेल 3 ची चाचणी करत होती, तरीही भारतात त्याची विक्री करण्यासाठी अजूनही अनेक ठोस पावले उचलायची आहेत.

कंपनीने भारतातील 2 शहरांमध्ये कार्यालये देखील बनवली आहेत.

या गाडीच्या मुळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत भारतात विकण्याचा विचार सरकार करत आहे. त्याचबरोबर टेस्लाही यासाठी पूर्ण तयारीत आहे. कंपनीने यापूर्वीच मुंबईत कॉर्पोरेट कार्यालय सुरू केले आहे. कंपनीने बंगळुरूमध्ये सुद्धा एक कार्यालय सुरू केलं आहे.

भारतात आयात शुल्क अजूनही जास्त

Tesla च्या मॉडेल 3 ची किंमत US मध्ये $39,990 (रु. 30 लाख) आहे. पण भारतात आयात शुल्कासह सुमारे ६० लाख रुपये लागतील. जे खूप आहे. सध्या भारतात 30 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या कारच्या आयातीवर विमा, शिपिंग खर्चासह 100% कर लागतो. त्याच वेळी, 30 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या कार आयात करण्यासाठी 60% पर्यंत आयात शुल्क भरावे लागेल.

Tags:    

Similar News