टेस्ला भारतात खरंच इलेलक्ट्रिक कार लॉन्च करतंय का? । Tesla Electric Cars

Update: 2023-05-19 02:52 GMT

Elon Musk यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी 'टेस्ला' लवकरच भारतात आपली गाडी लॉन्च करणार असल्याची शक्यता आहे. असे देखील म्हंटले जात आहे की, टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (17 मे) भारतीय सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली व या बैठकीत कंपनीने भारतात इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी उत्पादन युनिट स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली. असं जर असेल तर भारतात साधारण टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार कधी लॉन्च होऊ शकतात? जरी लवकरात लवकर लॉन्च झाली तरी त्यांची साधारण किंमत काय असेल? असे अनेक प्रश्न तुम्हाला असतील.. तर तुम्हाला पडलेल्या याच प्रश्नांची उत्तरे आपण शोधण्याचा प्रयत्न या करणार आहोत. 


जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेली व्यक्ती म्हणजे एलोन मस्क.. मस्क यांचे अनेक व्यवसाय आहेत. त्यापैकीच त्यांचा एक मोठा व्यवसाय म्हणजे इलेक्ट्रिक कार बनवण्याचा.. जगभरात वेगवेगळ्या इलेक्ट्रिक कार बनवणाऱ्या कंपन्यांपैकी टेस्ला ही एक मोठी कंपनी आहे. मागच्या अनेक वर्षांपासून ही कंपनी वेगवेगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिक व्हेईकल्स बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आणि त्यांनी अत्यंत यशस्वीपणे अशा अनेक इलेक्ट्रिक कार बनवल्या देखील आहेत. टेस्ला या कंपनीचे नाव वारंवार भारतात देखील चर्चेत असतं याचा कारण असं की, अद्याप ही कंपनी भारतात आपल्या कार लॉन्च करू शकलेली नाही. कंपनीचे मालक मस्क यांनी मागे लवकरात लवकर भारतात त्यांच्या इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार असल्याचे म्हटलं होतं. पण अद्यापही ते शक्य होऊ शकलेलं नाही..

आता लवकरात लवकर टेस्ला कंपनीच्या कार भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं की 17 मे म्हणजे काल टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली आणि या बैठकीनंतर या कंपनीचे उत्पादन भारतात बनवण्यासाठी उत्पादन युनिट स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली. असं अनेक माध्यमांच्या बातम्यांमधून समोर आला आहे. त्यामुळे आता टेस्ला भारतात कधी आपली कार लॉन्च करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.. आता याबाबत सर्वत्र चर्चा असली तरी अद्याप याबाबत सरकार, टेस्ला किंवा इलॉन मस्क यांच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याआधी गेल्या वर्षीही टेस्लाने भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु त्यानंतर कंपनी आणि सरकारमध्ये चर्चा होऊ शकली नाही.

टेस्ला आणि सरकार यांच्यात चर्चा का झाली नाही?

टेस्लाने सरकारकडे संपूर्ण असेंबल्ड वाहनांवरील आयात शुल्क 100% वरून 40% पर्यंत कमी करण्याची मागणी केली होती. हीच कंपनीची मागणी भारत सरकारने मान्य केली नाही त्यामुळे पुढील सर्व प्रकिया अडखळली होती. सरकारने म्हटले होते की, जर टेस्लाने भारतात उत्पादन प्रकल्प उभारण्याचे वचन दिले तर ते आयातीवर सवलत देण्याचा विचार करेल. पण इलॉन मस्क यांची इच्छा होती की आधी भारतात कार विकल्या जाव्यात, त्यानंतरच उत्पादन प्रकल्प उभारण्याचा विचार केला जाईल.

 तर टेस्ला आणि भारत सरकार यांच्यामध्ये सगळा असा प्रकार चालू असल्यामुळे टेसला अद्याप भारतात येऊ शकलेली नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात लवकरात लवकर या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होतील आणि टेसला भारतात येईल असं म्हटलं जात आहे. आता राहिला प्रश्न टेस्टला या गाडीची किंमत काय असणार? तर अद्याप भारतात या गाड्यांची किंमत काय असणार याबाबत कोणताही खुलासा कंपनीने केलेला नाही. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला टेस्टला या इलेक्ट्रिक कारची भारतात काय किंमत असेल हे समोर येईल.. पहिला कंपनी भारतात येईल मग आपल्याला त्यांची किंमत समजेलच... 

Tags:    

Similar News