‘ट्रोलींग विरोधात कारवाईची सुरुवात 'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' या पेजपासून करावी’

Update: 2020-05-03 09:47 GMT

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र, याच काळात राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये राजकीय डावपेच रंगताना दिसत आहेत. भाजपकडून त्यांच्या दिग्गज नेत्यांवर होत असलेल्या ट्रोलिंगच्या आक्षेपावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी हास्यदिनाच्या शुभेच्छा देत चांगलाच टोला लगावला आहे.

हे ही वाचा...

कोरोना सारख्या महाभयंकर संकटात देखील काही जागरुक नेटीझन्सनी गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजपा नेत्यांच्या फेसबुक पोस्टवर, लाईव्ह व्हिडीओवर जाऊन त्यांना विचारलेल्या प्रश्नांना 'ट्रोलिंग ऐसे नाव' देत कारवाईची मागणी केली जात आहे. आता जर गांधीगिरीचा वापर करत जर कुणी हसत असेल तर त्याला तुम्ही ट्रोलिंग कसं म्हणू शकता? असा सवाल रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केलाय.

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर सोशल मीडिय़ाच्या माध्यमातून अर्वाच्च भाषेत ट्रोलिंग होत असल्याचे आरोप केले आहेत.

राज्यावर मोठ्या प्रमाणात संकट असताना, पोलिसांवर हल्ले होत असताना, राज्यातील रुग्ण संख्या देशात जास्त असताना, रेशन लोकांना मिळत नसताना, या बाबी सरकार समोर मांडणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. संकटाच्या काळात सरकारला प्रश्न विचारणे चुकीचे आहे का असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/667744390444848/?t=1

या आरोपनंतर अर्वाच्च भाषेत ट्रोलिंग पद्धतीचा सर्वाधिक राजकीय वापर कोणी केला यावर आता राजकारण अधिकच तापताना दिसत आहे. २०१४ ला सत्तेत येण्यासाठी भाजपने 'आघाडी-बिघाडी', 'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' अशा पेड ट्रोलर्सकडून शरद पवार, अजित पवार , सुप्रिया सुळे , सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांसारख्या दिग्गज नेत्यांवर अश्लील ट्रोलींग केल्याचा आरोपही चाकणकर यांनी केला आहे.

गृहविभागाने सर्व ट्रोल्स वर शोधून कडक कारवाई करावी आणि त्याची सुरुवात 'आघाडी-बिघाडी' , 'देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र' या पेजेसपासून करावी हा विषयच संपुष्टात येईल. अशी मागणी त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून केलीय.

Full View