राहुल गांधींच्या प्रवासी मजूरांच्या भेटीवर भडकल्या निर्मला सीतारमण

Update: 2020-05-17 11:09 GMT

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज सलग पाचव्या दिवशी २० लाख करोडच्या विशेष पॅकेजसंबंधी माहिती दिली. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना प्रवासी मजुरांविषयी विचारणा करण्यात आली. यावर अर्थमंत्री राहुल गांधी यांच्यावर चांगल्याच भडकल्या. त्यांनी कॉंग्रेसचा तीव्र विरोध करताना ‘रस्त्यावर मजूरांसोबत बोलत बसून राजकारण करण्याची ही वेळ नाही. कॉंग्रेसने मजुरांच्या मुद्द्यावर राजनीती करु नये अशी विनंती सीतारमण यांनी केली आहे.

हे ही वाचा..

निर्मला सीतारमण यांनी म्हटलं की, “मला विरोधी पक्षांना आवाहन करायचं आहे की, स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर आपण एकत्र काम केलं पाहिजे. आम्ही सर्व राज्यांसोबत या मुद्द्यावर चर्चा करत असून लक्ष ठेवून आहोत. सोनिया गांधी यांना हात जोडून मी विनंती करते की, आपण स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर जबाबदारीने बोललं आणि वागलं पाहिजे”

शनिवारी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी रस्त्यावर बसून प्रवासी मजूरांसोबत त्यांच्या अडचणींविषयी चर्चा केली होती. यावर राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना सीतारमण यांनी म्हटलं की, “ज्या राज्यांमध्ये कॉंग्रेसचं सरकार आहे तिथे प्रवासी मजुरांना सुविधा द्यावी त्यांनी घरी पोहोचवावं. केंद्र सरकारकडे अधिकाधिक रेल्वेंची मागणी करावी. पण कॉंग्रेस त्यांची सत्ता असलेल्या राज्यामध्ये प्रवासी मजूरांसाठी अधिक रेल्वेची मागणी का करत नाही? “ असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.