Home > ‘पृथ्वीराज बाबा काशी विश्वेश्वराच्या मंदिरात कधी जायचे फक्त सांगा.. कोण रोखतंय ते बघूच’

‘पृथ्वीराज बाबा काशी विश्वेश्वराच्या मंदिरात कधी जायचे फक्त सांगा.. कोण रोखतंय ते बघूच’

‘पृथ्वीराज बाबा काशी विश्वेश्वराच्या मंदिरात कधी जायचे फक्त सांगा.. कोण रोखतंय ते बघूच’
X

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी देशातील सर्व देवस्थानांकडील सोने कर्जरुपाने घेऊन कोरोनाविरोधातील लढाई लढावी असा सल्ला भाजप सरकारला दिला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप नेते आणि देशभरातील अनेक मंदिरांच्या ट्रस्टच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्यांच्या या सल्ल्यानंतर काशी विश्वनाथ मंदिराच्या महंतांनीही पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना काशी विश्वनाथाच्या मंदिरात आजीवन बंदी घातली आहे.

हे ही वाचा...

यावर चव्हाण यांची बाजू घेत भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) पुढे आल्या असून ‘पृथ्वीराज बाबा काशी विश्वेश्वराच्या मंदिरात कधी जायचे फक्त सांगा.. कोण रोखतयं ते बघूच’ असं म्हणत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

तृप्ती देसाई यांनी म्हटलंय की,

" बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजेच काशी विश्वेश्वरआणि त्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरात कोणी जर आमचा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजी चव्हाण यांना आणि त्यांच्या परिवारांना काहीही कारण नसताना आजीवन बंदी घातली असे सांगत असेल, धमकी देत असेल तर मला त्यांना एवढेच सांगायचं की आपला देश संविधानानुसार चालतो.या देशात प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, आणि "आम्ही बंदी घातली असे सांगून मंदिर तुमच्या मालकीचे आहे असे समजू नका"... मंदिर हे सर्व भक्तांचे असते आणि हे शिवशंकराचे मंदिर आहे आज देव मुर्तीस्वरूपात आहे. जर देव खरोखरच जिवंत स्वरूपात असता तर मंदिरात बंदी घालणार्यांना नक्कीच शिक्षा दिली असती.

देवाला सगळे भक्त समान असतात केवळ राजकारण म्हणून एखाद्याला मंदिरात बंदी असं कोणी जर म्हणत असेल तर पृथ्वीराज बाबा तुम्हाला कधी काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जायचे फक्त सांगा ही तृप्ती देसाई तुम्हाला त्या मंदिरात तुमच्या कुटुंबासह घेऊन जाईल कोण रोखतयं ते बघूच.

कोणी आवाज उठवला तर तो दाबण्याचे षड्यंत्र सत्ताधाऱ्यांकडून होत आहे, ते आम्ही अजिबात खपवून घेणार नाही- सौ.तृप्ती देसाई संस्थापक-अध्यक्ष भूमाता ब्रिगेड

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/262523465117022/?t=0

हे ही वाचा..

Updated : 17 May 2020 10:11 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top