मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ

Update: 2020-05-18 08:39 GMT

विधान परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ जणांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी आणि भाजपच्या सदस्यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ देण्यात आली.

हे ही वाचा...

राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घटनांमुळे चर्चेत राहिलेल्या आणि नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह माजी उपसभापती नीलम गो-हे, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड तर भाजपचे गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील आणि रमेश कराड यांची बिननिरोध निवड झाली आहे.

Courtesy : Social Media

त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आल्यानंतर या ९ नवनिर्वाचित सदस्यांना विधान परिषद सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांसह या नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली आहे.