यशोगाथा : ..आणि दुर्गा बनली सरस्वती

Update: 2020-11-12 13:45 GMT

दुर्गा गुडीलू आदिवासी वैदु समाजातील एक धडपडी मुलगी. दुर्गा यांनी केवळ स्मार्ट फोन नसल्याने मुलांचे भविष्य अंधारात राहू नये म्हणून मुंबई जोगेश्वरी पुर्वेला वैदू समाजाच्या वस्तीतील मुलांना एकत्र करुन शिकवण्यास सुरुवात केली. मुलांना पाठ्यपुस्तक शिक्षणा बरोबरच दुर्गाने योगा, नृत्यकला शिकवली. नावच दुर्गा असलेली ही बाई या आदिवासी मुलांसाठी सरस्वती बनली. त्यांनी दिलेल्या या भरिव योगदामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.

कोरोनाच्य़ा संकट काळात आपापल्या परिने गरजूंना मदत करण्यासाठी काही रणरागिणींनी आपल्या जीवाची परवा न करता समाजकार्य केले. आपल्याकडे जे आहे त्यामधून इतरांना मदत करण्याची आपली भारतीय संस्कृती आहे. याच संस्कृतीचे पालन करत राज्यातील काही रणरागिणींनी आपापल्या क्षेत्रातील कामाच्या व्यापातून वेळ काढत गरजूंना लॉकडाऊनच्या काळात मदत केली. या महिलांच्या याच कार्याची दखल घेत मॅक्स वुमन आणि महिला व बालविकास विभागातर्फे या कोरोना रणरागिणीचा गौरव करण्यात आला. यावेळी महिला व बालविकास मंत्री एड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते या हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन उपस्थित होत्या.

Tags:    

Similar News