मंगळसूत्र गहाण ठेवून पोरीला शिकवलं पण पुढं काय?

Update: 2020-08-02 01:08 GMT

काही दिवसांपुर्वीच दहावीचा निकाल लागला. यात उत्तीर्ण झालेल्या अनेकांच्या संघर्ष गाथा तुम्ही पाहील्या असतील, वाचल्या असतील किंवा कुणी तुम्हाला सांगीतल्या असतील. पण, आज आम्ही तुम्हीला अशा एका मुलीची सक्सेस स्टोरी सांगणार आहोत, जीचा संघर्ष फक्त शिक्षणसाठी नाहीय तर जिवंत राहण्यासाठीसुध्दा आहे.

होय तूम्ही खर ते वाचताय... हा संघर्ष आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालूक्यात रामनगर इथ राहणाऱ्या ‘विद्या’चा. (मुलीचे संपुर्ण कुटूंब HIV पिडीत असल्याने नाव गुप्त ठेवण्यात आली आहेत. सर्व नावं काल्पनीक).

विद्याची सांगते की, “मी माझे पूर्ण कुटुंब एच आय व्ही बाधित आहे. माझ्या मुलीला मी गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवून दहावी शिकवलं. आजारी असुनही ती रात्रभर जागून अभ्यास करत होती. शाळेतील घाडगे सरांनी तिची फी भरली अशा परीस्थितीत तिने ७४ टक्के गुण मिळवले. पण पुढे शिकवण्यासाठी माझ्याकडे विकायला सुद्धा काही नाही सरकार म्हणते बेटी पढाव बेटी बचाव या परीस्थितीत मी तिला शिकवायच कसं आणि तिला वाचवायचं तरी कसं?” असा सवाल विद्याची आई करते.

विद्याचा संपुर्ण परिवार एच आय व्ही बाधित असल्याने आरोग्याच्या सतत कुरबुरी सुरू असतात. वडील ग्रामपंचायतीत शिपाई आहेत. पण त्यांना तुटपुंजा पगार तो सुध्दा कधी वेळेत नाही की साधी पगारवाढ नाही. या परीस्थितीत दुसऱ्याच्या पडक्या घरात हे कुटुंब राहत आहे. त्यातच आता घरमालकाने घराचे पत्रे काढून नेणार असल्याचं सांगीतलं. त्यामुळे आता राहायचं कुठे हा प्रश्न विद्याच्या कुटूंबासमोर उभा राहिला आहे.

आपली ही परिस्थिती केवळ शिक्षणातून बदलू शकते हे विद्या जाणून असल्याने तीला या परीस्थितीवर मात करण्यासाठी पुढे शिकायचं आहे. पण आता विकायलाही दुसरे काहीच नसल्याने पोरीला पुढ कसं शिकवायचं असा प्रश्न सध्या विद्याच्या आई वडिलांसमोर आहे.

तिची आई सांगते की त्यांनी अनेकांना मदतीसाठी विनंती केली. स्थानिक आमदार अनिल बाबर यांना देखील त्यांनी मदत मागितली पण आश्वासना पलीकडे त्यांना काहीच मिळाले नाही. यावर उपाय म्हणून विद्याने समाजातील दानशूर व्यक्तींना तिने एक पत्र लिहिलेले आहे. यात तिने मदतीचे आवाहान केलं आहे.

[gallery ids="15732,15733,15734"]

कुणीतरी विद्याच्या शिक्षणाचा खर्च उचलावा अशी अपेक्षा कुटुंबाने व्यक्त केली आहे.

(सदर मुलीला मदत करायची असल्यास आमच्याशी संपर्क साधू शकता.)

Similar News